Previous
Next
Previous
Next

गर्भसंस्कार पुरस्कार सोहळा

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे (पद्मश्री) यांच्या २८ जून या जन्मदिवसाच्या  निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 

गर्भसंस्कार करून जन्माला आलेल्या बालकाचा गौरव व्हावा, त्याच्या मातापित्यांनी केलेल्या संस्कारांची, घेतलेल्या परिश्रमांची पावती मिळावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भसंस्कारांचा आपला अनुभव  अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठीचे हे एक उत्तम व्यासपीठ होय.

आम्ही तुमची आणि तुमच्या सुदृढ बाळाची वाट बघत आहोत. यायला विसरू नका !

पुरस्कारप्राप्तीसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे

प्रत्येक कुटुंबाने आपल्या बाळासाठी संतुलन गर्भसंस्कार केलेले असावेत. हे संस्कार श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकात नमूद केल्या प्रमाणे असावेत. 

संतुलन आयुर्वेदातर्फे  बाळाच्या विकासाचे टप्पे इत्यादी निकषांवर ते सर्वोकृष्ट बाळांची निवड केली जाईल आणि त्या बाळाला आणि कुटुंबातील मातापित्यांना गर्भसंस्कार पुरस्कार देऊन गौरविले जाईल.

पुरस्काराठी  सहभागी झालेल्या सर्व कुटुंबांना संतुलन गर्भसंस्कार प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. 

यावर्षी सोहळ्याचे ११वे वर्ष असून २0१९ ते २0२१ या कालावधीत झाला आहे त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.

कार्यक्रमाची तारीख - मंगळवार, २८ जून, २०२२ (श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचा जन्मदिन)
प्रवेशअर्ज स्वीकारण्याची तारीख – १५ मे ते १५ जून ,२०२२

( सूचना: १५ जून नंतर आलेले प्रवेशअर्ज स्वीकारले जाणार नाहीत) 
पुरस्कार दिनांक : २८ जून,२०२२
स्थळ : लवकरच जाहीर करण्यात येईल.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य, अध्यात्मिक गुरू आणि गर्भसंस्कार संकल्पनेचे प्रणेते !

श्रीगुरुजींनी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आणि आयुर्वेदाला जनमानसात प्रतिष्ठा मिळण्यासाठी अथक व अद्वितीय प्रयत्न केलेले आहेत. आयुर्वेदाची औषधे, पंचकर्म उपचार, व्याख्याने, लिखाण आदिच्या माध्यमातून त्यांच्यामुळे असंख्य व्यक्तींना आरोग्याचा अनुभव मिळालेला आहे आणि यापुढेही मिळत राहील. संतुलन आयुर्वेद ही त्यांची फार्मसी आज प्रभावी आणि उच्च गुणवत्तायुक्त औषधे बनवण्यामधे देशाविदेशात अग्रेसर म्हणवली जाते. सर्व संतुलन उत्पादने तसेच संतुलनमधील सर्व प्रकल्प श्रीगुरूजींच्या प्रेरणेतून साकार झालेले आहेत.

डॉ. मालविका तांबे

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मालविका तांबे ( एम.डी) यांनी संतुलन गर्भसंस्कार, पंचकर्म  चिकित्सापद्धती याचा प्रचार व प्रसार केला. डॉ. मालविका तांबे या आहार तज्ज्ञ असून त्या जीवनशैली व त्यासंबंधित उद्भवणारे आजार याच्या अभ्यासक आहेत.  त्या आपल्या रुग्णांसाठी नेहमी साम टिव्हीवर माहितीपूर्वक  कार्यक्रम करतात तसेच ‘सकाळ’ या वृत्तपत्राच्या प्रसिद्ध ‘फॅमिली डॉक्टर’ या सदरात लिखाण करतात.

डॉ. मालविका या संतुलन आयुर्वेदाच्या प्रमुख चिकित्सक असून आता त्या  संतुलन आयुर्वेदची प्रगल्भ परंपरा व वारसा आपल्या नेतृत्व कौशल्याने, विविध वेबिनार, चर्चासत्रे यांनी पुढे नेत आहेत.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

निष्णात आयुर्वेद स्नातक, अध्यात्मिक गुरू,आयुर्वेदीय गर्भसंस्कार संकल्पना संशोधक तसेच आयुर्वेदीय चिकित्सा व पंचकर्म यांचे सखोल अभ्यास व ज्ञान यांचा परिपुर्ण उपयोग करून सर्व मानवजातीचे कल्याण व आरोग्यसंपन्नता प्राप्त करून देणे हे श्रीगुरूंचे धेय्य होते. 

या कार्याला सुदृढ व सुव्यवस्थित करण्यासाठी,गुणवत्तेवर आधारित आयुर्वेदिक औषधे निर्माण करण्याकरिता श्रीगुरूंनी ‘संतुलन आयुर्वेद ‘ ची निर्मिती केली. 

त्यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने संतुलन आयुर्वेद येथे गुणकारी व शास्त्रोक्त औषधांची निर्मिती होते ज्यांचा फायदा देश विदेशातील हजारो रुग्णांना झालेला आहे.

डॉ. मालविका तांबे

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मालविका तांबे ( एम.डी) यांनी संतुलन गर्भसंस्कार, पंचकर्मा  चिकित्सापद्धती याचा प्रचार व प्रसार केला. डॉ. मालविका तांबे या आहारतज्ञही  असुन त्या जीवनशैली व त्यासंबंधीत उद्भवणारे आजार याच्या अभ्यासक आहेत.  त्या आपल्या रुग्णांसाठी नेहमी साम टिव्हीवर माहितीपुर्वक कार्यक्रम करतात तसेच ‘सकाळ’ या वृत्तपत्राच्या प्रसिद्ध ‘फॅमिली डॉक्टर’ या सदरात लिखाण करतात.

डॉ. मालविका या संतुलन आयुर्वेदाच्या प्रमुख चिकित्सक असून आता त्या  संतुलन आयुर्वेदची प्रगल्भ परंपरा व वारसा आपल्या नेतृत्व कौशल्याने, विविध वेबीनार, चर्चासत्रे यांनी पुढे नेत आहेत.

गर्भसंस्कार चिकित्सेसाठी अपॉइंटमेंट आजच बुक करा

अपॉइंटमेंट बुकिंग करिता खालील माहिती भरून पाठवा